भाजपाच्या ठाणे लोकसभा प्रमुखपदी विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड

भाजपाच्या ठाणे लोकसभाप्रमुखपदी राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड नुकतीच जाहीर केली. त्याचबरोबर ठाणे लोकसभाअंतर्गत विधानसभा निवडणूकप्रमुखपदावरही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वात ठाणे लोकसभा मतदारसंघात पक्षाची रणनीती ठरविण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघातही निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी आमदार निरंजन डावखरे, ओवळा-माजिवडा मतदारसंघाच्या प्रमुखपदी महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, ठाणे मतदारसंघात माजी उपमहापौर सुभाष काळे, मिरा-भाईंदरमध्ये जिल्हाध्यक्ष रवी व्यास, ऐरोलीत सागर नाईक आणि बेलापूरमध्ये निलेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading