ठाणे जिल्हा बॅकेत आता ‘क्यूआर कोड’

महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या पाच बँकांपैकी एक असलेली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आता डिजीटली हायटेक बनली आहे. भविष्यातील गरज ओळखून बँकेने ‘क्यूआर कोड’ प्रणाली सुरु केली आहे. या सेवेचे अनावरण बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या ही सेवा मोफत उपलब्ध असल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागासाठी आधारवड असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाविन्यपुर्ण योजना राबवण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने बँकेच्या खातेदारांसाठी व्हॉईस अनाउन्समेंट फिचरसह स्वतःच्या क्युआर कोड सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेचा लाभ दुकानदार, सहकारी गृहनिर्माण सोसायट्या, कन्झ्युमर सोसायटी, क्रेडीट सोसायटी, शैक्षणिक संस्था, फिशरी सोसायटी, ग्रामपंचायत, हायस्कुल, नागरी पतसंस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, बचतगट, पगारदार संस्था, विविध प्रकारच्या सोसायट्या या संस्थांच्या विविध शाखांतील खात्यांवर पैसे जमा करुन घेण्याकरिता होणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार असुन सध्या ही सेवा ग्राहकांना मोफत पुरवण्यात येणार असल्याचे राजेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading