भरधाव जाणारा सिमेंट कंटेनर एका घरात शिरल्याने मोठा अपघात

कल्याण नगर महामार्गावर यते गावातील बांधणी पाडा दरम्यान एका घरात भरधाव सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर घुसल्याने मोठा अपघात घडला असून या घटनेत घरातील कुटूंब बचावले आहे. यामध्ये घराचे खूप मोठे नुकसान झाले असून एक चार चाकी आणि एक दुचाकी चक्काचूर झाली आहे. तर कंटेनर चालक दारूच्या नशेत भर वेगाने सिमेंट भरून नेणारा कंटेनर नेत असताना गाडी वरील ताबा सुटल्याने ही घटना घडली असल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी आरोप करत सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नसल्याचे सांगत या महामार्गावर सुरक्षा भिंत उभारण्यात यावी तसंच नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यते गावातील बांधणी पाडा रोड वर भदाणे कुटूंब राहत असून घरात सिमेंट भरून नेणारा कंटेनर अचानक घरात घुसल्याने दोन गाड्यांसह घराचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या भदाणे कुटूंबाने ट्रक चालक दारूच्या नशेत भर वेगाने हा कंटेनर नेत असताना गाडी वरील ताबा सुटल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप करत या प्रकरणी झालेल्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading