भरड धान्य उत्सव – भरड धान्यांचे प्रदर्शन

भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह सन 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (म्हणजेच मिलेट्स वर्ष )घोषित केले आहे. त्यानिमित्ताने शाळेत शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी भरड धान्य उत्सव साजरा करण्यात आला. त्या अंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी भरड धान्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी भरड धान्यांची ओळख करून दिली, तसेच त्यातील पौष्टिक घटकांची माहिती सर्वांना करून दिली. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी याच भरड धान्यांच्या पाक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी धान्याच्या विविध नाविन्यपूर्ण पाककृती सादर केल्या. या उपक्रमाला बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या विंदा मांजरमकर यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भरड धान्यांबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. विद्या प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading