भगवान गौतम बुध्द यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवळ वाहतुकीत बदल

राबोडी वाहतूक उपविभागाचे हद्दीत ५ मे  ते ६ मे  रोजी भगवान गौतम बुध्द यांच्या २५६६ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवळ शिशुज्ञान मंदिर शाळेच्या बाजूस मनोरंजनाचे  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊन नागरीकांची गैरसोय होवू नये आणि  परिसरातील वाहतूक सुरळीत, सुनिश्चित होण्याकरीता वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

 वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे :-

        प्रवेश बंद :- सिव्हिल हॉस्पीटल कॉर्नर कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून डावे वळण घेवुन खोपट नाक्याचे दिशेने जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.    पर्यायी मार्ग :- सदरची वाहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सरळ उथळसर रोडने मिनाताई ठाकरे चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

            ही वाहतूक अधिसूचना दि. ०५ मे २०२३ रोजी दुपारी १२.०० ते दि. ०६ मे २०२३ रोजी रात्री २३.४५ वाजेपर्यंत  अंमलात राहील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading