संस्कार भारती ठाणे जिल्हा समितीतर्फे रांगोळी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. नौपाड्यातील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक १९ मध्ये ६ मे ते २९ जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत दर शनिवारी ४ ते ६ या वेळेत या शिबीराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्कार भारतीतर्फे देण्यात आली. ब-याच कालावधीनंतर रांगोळी प्रेमींच्या आग्रहास्तव हे शिबीर आयोजित करण्यात येत असून रांगोळी प्रेमींनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी १ हजार रूपये शुल्क आकारण्यात येणार असून संस्थेतर्फे रंग रांगोळी आणि रांगोळीचं पुस्तक देण्यात येणार आहे. या सराव शिबीरामधे संस्कार भारती रांगोळीची सगळी चिन्ह, तसेच ती चिन्ह वापरून रांगोळी कशी विस्तारीत करायची, रंग कसा टाकायचा हे शिकवलं जाणार आहे.