ब्रह्मांड कट्टयावर नृत्यजल्लोषात सरत्या वर्षाला निरोप

ठाणे: ब्रह्मांड कट्टा सामाजिक-सांस्कृतिक मंडळ आयोजित व सांज स्नेह ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सौजन्याने  या वर्षांला निरोप व नविन वर्षाचे स्वागत टॅलेंट हाऊस प्रस्तुत ‘आजा नच ले’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्येक लहान थोरांच्या अंगी कलागुण असतात. अशा कलाकारांना शिकवून प्रोत्साहित करण्याचे काम टॅलेंट हाऊस करते असे प्रतिपादन टॅलेंट हाऊसच्या संस्थापिका व फिटनेस गुरू अनिता मिश्रा यांनी केले. तसेच अशा संस्थाना,कलांना व कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम गेली १५ वर्षे सातत्याने ब्रह्मांड कट्टा करत आले आहे.  ‘आजा नच ले’ या कार्यक्रमात टॅलेंट हाऊस च्या ५ वर्षापासून ५० वर्षापर्यंत च्या ३० ते ३५ गुणी कलाकारांनी आपली नृत्य कला सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात शालीनी मिश्रा यांच्या नृत्याविष्काराने झाली. शालीन मिश्रा या टी.व्ही आर्टिस्ट असून नृत्य दिग्दर्शिका देखील आहेत. आजच्या कार्यक्रमात बुगी बुगी फेम ,डान्स इंडिया डान्स सीजन३ ओमकार वेंगुर्लेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या फोक डान्स, लावणी,झुंबा डान्स, क्लासिकल, इंडीयन-वेस्टर्न, हिपहाॅप,ग्रुप डान्स , सोलो डान्स असे नृत्याचे विविध प्रकार टॅलेंट हाऊसच्या कलाकारांनी सादर केले . या कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध आर.जे. अजित शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते फायरबाॅय समीर व सारेगमप लिटिल चॅम्प फेम कु.हरमेहेर कौर याची उपस्थिती. फायरबाॅय समीर यांनी नाकाने खुर्ची उचलणे अशी अचंबित करणारी सुप्रसिद्ध प्रात्यक्षिक सादर केली व प्रेक्षकांची मने जिंकली. तर लिटील चॅम्प्स  हरमेहेर कौर हिने गोड आवाजातील गाणी व वादन सादर करून मंत्रमुग्ध केले. ओमकार वेंगुर्लेकर यांनी सादर केलेल्या समूहनृत्य कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading