बिर्ला महाविद्यालयात बीएमएमच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या श्रुती भोईरची मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात निवड

कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयात बीएमएमच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या श्रुती भोईरची मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात निवड झाली आहे. याचे श्रेय ती शिक्षक, प्रशिक्षक श्रीकांत वाड, भागवत आणि पालकांना देते. तिने राज्य आणि राष्ट्र स्तरावरील स्पर्धेत भाग घेऊन अनेक पारितोषिके मिळवली आहेत. २५ सप्टेंबर रोजी विभागीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडली. ठाणे, मुंबई आणि कोकणातील २२ महाविद्यालयांच्या टीम यात सहभागी झाल्या होत्या, त्यात श्रुतीला ब्राँझ मेडल मिळाले. कल्याण येथे झालेल्या आंतर महाविद्यालय बॅडमिंटन स्पर्धेत ती पहिली आली. तिच्या निमित्ताने बिर्ला महाविद्यालयाला २५ वर्षानंतर हा बहुमान मिळाला. श्रुती भोईर हिचे खेळातील प्रावीण्य पाहून मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात तिची निवड झाली आहे. श्रुतीला बालपणापासून बॅडमिंटन या खेळाची आवड आहे. तिच्या आजी- आजोबा आणि आई वडिलांनी ही आवड जोपासत प्रोत्साहन दिले. त्यामुळेच की काय बिर्ला महाविद्यालयात आल्यावर तिच्यासाठी नवे आकाश खुले झाले. बॅडमिंटन खेळत असताना अभ्यासही ती आवडीने करते.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading