बाळासाहेब ठाकरे चौपाटी जवळील श्री गणेश विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाट यांचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण

घोडबंदर रोड येथील नागला बंदर खाडी किनारा विकास प्रकल्पांतर्गत हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी जवळील श्री गणेश विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाट यांचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. गायमुख येथे नागला बंदर पाशी गणेश विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाट तयार करावा अशी अनेक वर्षापासूनची स्थानिक रहिवाशांची मागणी होती. त्यानुसार, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ठाणे महापालिका यांच्या अनुदानातून स्मार्ट सिटीचा प्रकल्प विकसित करण्यात आला. ठाणे महापालिकेने येथील नागरिकांची मागणी मान्य करुन सुविधा उपलब्ध केली आहे. याचा फायदा गायमुख, कासारवडवली, ओवळा, मोघरपाडा तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होणार आहे. तसेच या ठिकाणी आवश्यक सुविधा देखील महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जाणार आहे. या घाटाशेजारीच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्र. २ चे उद्घाटन लवकरच होणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading