महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, आणि राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय येथै साफसफाईच्या नवीन व्यवस्थेस सुरूवात

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय येथील साफसफाईच्या नवीन व्यवस्थेस बुधवार, पासून सुरूवात झाली. नवीन कंत्राटाचा कार्यारंभ ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय आणि आसपासचा परिसर यांच्या साफसफाईचे कंत्राट कृष्णा कंस्ट्रक्शन यांना मिळाले आहे. त्यांचे १८० कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये कार्यरत राहणार आहेत. नवीन कामाच्या माध्यमातून रुग्णालय स्वच्छतेचा नवीन अध्याय रुग्णालयात सुरू होत आहे, असा विश्वास आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी, आयुक्त बांगर यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पगार वेळेत होतील, याची खात्री बाळगा आणि तुमच्याकडून सफाईत कोणतीही कसूर होणार नाही, याची दक्षता घ्या, असे आयुक्त म्हणाले.
खराटा, फडके, बालदी हे स्वच्छतेचे रुप बदलून यंत्र, मॉप, डस्टर यांचा वापर सुरू होणार आहे. त्या यंत्रांची काळजी घ्यावी. त्यात काही छेडछाड झाली. जाणीवपूर्वक कोणी त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कडक कारवाई केली जाईल. कोणताही स्वच्छता कर्मचारी त्यांची यंत्र सामुग्री आणि सुरक्षा साधने या शिवाय दिसणार नाही, याची खबरदारी घेण्यास आयुक्तांनी सांगितले. शौचालयांच्या स्वच्छतेसाठी तेथे कायमस्वरुपी कर्मचारी उपस्थित राहतील. त्यांच्याकडे तेच काम दिले जाईल. शौचालयनिहाय वेगळे कर्मचारी असतील. दिवसातून ठराविक वेळी नव्हे तर स्वच्छतागृहाचा वापर झाला की वेळोवेळी त्याची स्वच्छता केली जाईल.
सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत व्हावे. प्रत्येक कामगाराला त्याची सॅलरी स्लिप मिळावी. भविष्य निर्वाह निधी आणि राज्य विमा योजना यांची प्रदाने वेळेत जमा केली जावीत. या प्रदानांची पूर्तता केल्यावरच कंत्राटदाराचे मासिक देयक दिले जाईल, असेही करारनाम्यात नमूद करण्यात आले आहे. त्याची काटेकोरपणे अमलबजावणी केली जाणार आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading