बनावट टीव्हींची नामांकीत कंपन्यांची लेबल लावून विक्री करणा-या एकाला अटक – ६० टीव्ही हस्तगत

ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेनं नामांकीत कंपन्यांचे बनावट टीव्ही बनवून विक्री करणा-या गुन्हेगारास अटक केली असून त्याच्याकडून साडेपाच लाखांचे ६० बनावट टीव्ही हस्तगत केले आहेत. ठाण्यामध्ये नामांकीत ब्रँडचे बनावट टीव्ही बनवून विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. गुन्हे शाखेतील पथकानं याबाबत माहिती काढली असता काल्हेरमधील एका दुकानात असेंबल केलेल्या साध्या टीव्हींना सोनी, सॅमसंग, एलजी अशा नामांकीत कंपन्यांची लेबल्स लावून विक्री केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार काल्हेर येथील एच बी इलेक्ट्रीकल्स ॲण्ड होम अप्लायसेन्स मधील अजय सिंग याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यानं नामांकीत कंपनीच्या बनावट टीव्हींची विक्री करून फसवणूक केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोनीचे १०, सॅमसंग १, आयव्हा १ तसंच लोकल असेंबल केलेले ४८ टीव्ही हस्तगत करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading