दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे टिटवाळ्यातील पारस बाल अनाथाश्रमामध्ये होळी आणि धुळवड अनाथ मुलांबरोबर साजरी

दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे टिटवाळ्यातील पारस बाल अनाथाश्रमामध्ये होळी आणि धुळवड अनाथ मुलांबरोबर साजरी करण्यात आली. सणासुदीच्या दिवशी मुलांना आई-वडिलांची कमतरता भासू नये या उद्देशानं विविध कार्यक्रमांचं आयोजन दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे पारस बाल अनाथाश्रमात करण्यात आलं होतं. अनाथाश्रमातील बालकांना पुरणपोळीचं जेवण तसंच कपडे, शैक्षणिक पुस्तकं तसंच दैनंदिन जीवनात लागणा-या वस्तूंचं वाटप करण्यात आलं. अनाथाश्रमाच्या संचालकांना अनाथाश्रमासाठी तांदूळ, तूरडाळ, पोहे भेट देण्यात आले. मुलांना छत्रपतींचा इतिहास माहित व्हावा या उद्देशानं संस्थेला छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट म्हणून प्रतिष्ठानतर्फे देण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading