प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे कलाभवन येथे एका प्रदर्शनाचं आयोजन

प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे कलाभवन येथे एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्लास्टीकच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी जनजागृती करण्याकरिता या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. स्वच्छता ही सेवा ही मोहिम ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येत आहे. या उपक्रमात प्लास्टीक बाटल्यांचा वापर करून राष्ट्रपिता महात्मा गांधींची प्रतिकृती साकारण्यात आली असून अशाच प्रकारे इतरही प्रतिकृती तयार करण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात नागरिकांना प्लास्टीकचा वापर आणि प्लास्टीकच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीबाबतची संपूर्ण माहिती वेसॅक इंडिया या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांतर्फे देण्यात येत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading