हार्बर मार्गावर पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाली होती. ट्रान्सहार्बर मार्गावर ऐरोली ठाणे दरम्यान रेल्वेचा पेंटाग्राफ तुटल्यानं उपनगरीय सेवा विस्कळीत झाली. उपनगरीय सेवा विस्कळीत झाल्यामुळं रेल्वे प्रवाशांना पायपीट करत आपला प्रवास करावा लागला. दोन्ही मार्गावर रेल्वेसेवा ठप्प उभ्या असल्याचं चित्र दिसत होतं. दुपारी कामावर जाण्याची वेळ असतानाच हा पेंटाग्राफ तुटल्यानं प्रवाशांना त्याचा चांगलाच फटका बसला.