प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर ऑनलाईन आरटीओ सेवा देणा-या वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई

ठाणे वाहतूक शाखेनं प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर ऑनलाईन आरटीओ सेवा देणा-या वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हजुरी येथील दुस-या प्रवेशद्वारासमोर आरटीओ विषयक ऑनलाईन सेवा देणारे काम करत असतात. ही मंडळी आपली वाहनं उभी करून या वाहनांतून ऑनलाईन सेवा देत असतात. गेली तीन वर्ष सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत या गाड्या उभ्या असतात. या गाड्यांमुळे कुठेही वाहतूक कोंडी अथवा इतर कशाचाही प्रश्न निर्माण होत नाही. उलट वाहन चालकांना सेवा मिळते. काल अचानक अशा ६ वाहनांना सेवा देणा-या व्यक्ती आतमध्ये काम करत असताना त्यांना गाडीबाहेर बोलवण्यात आलं आणि त्यांच्या चाव्याही जप्त करून त्यांच्या वाहनांना जॅमर लावण्यात आले. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे अशी सेवा देणा-या व्यक्तींनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading