प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात महापालिका अधिका-यांची विशेष नेमणूक

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाची कार्यक्षमता राबवण्याच्या दृष्टीने आणि विशेषत: सद्यस्थितीत सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्याच्या दृष्टीकोनातून प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात महापालिका अधिका-यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली तीन वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली असून ही पथकं आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यरत असणार आहेत. अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्या नियंत्रणाखाली उपायुक्त संदीप माळवी यांच्या समन्वयाअंतर्गत विनोद इंगळे, महेश रावळ हे अधिकारी कार्यरत असणार आहेत. उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या समन्वयाअंतर्गत गुणवंत झांबरे आणि फारूक शेख, उपायुक्त अशोक बुरपुले यांच्या समन्वयाअंतर्गत दशरथ वाघमारे, मकरंद काळे तर उपायुक्त मनिष जोशी यांच्या समन्वयाअंतर्गत देवेंद्र नेर, गजानन गोदापुरे हे अधिकारी कार्यरत असणार आहेत. सर्व अधिकारी नेमून दिलेल्या दिवशी आणि वेळेत आपले दैनंदिन कामकाज सांभाळून महापालिका हद्दीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्याच्या दृष्टीकोनातून प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यरत असणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading