प्राथमिक शिक्षण विभागातील ३३ शाळा अनधिकृत

प्राथमिक शिक्षण विभागामार्फत अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमा मधील तरतुदीनुसार व्यवस्थापनाला एक लाख रूपये दंड आणि नोटीसच्या दिनांकापासून शाळा बंद न केल्याने पुढील प्रत्येक दिवशी रक्कम दहा हजारप्रमाणे दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे. शासकीय कारवाई करताना ग्रामीण भागातील अनधिकृत शाळांना सुरुवातीला नोटिस बजावण्यात आली होती त्यानंतर काही शाळा बंद करण्यात आले तर काही शाळांनी पुनःश्च शाळा सुरू न करण्याचे हमी पत्र सादर केले. अनधिकृत शाळांवर प्रशासनामार्फत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील अशा प्रकारच्या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. असं आवाहन जिल्हा परिषदेनं केलं आहे.
इतरत्र शहरी भागातील अनधिकृत शाळेत पालकांनी प्रवेश घेऊ नये. यातील काही शाळा बंद करण्यात आल्या असून पुन्हा सुरू करण्याच्या शक्यता आहे त्यामुळे पालकांनी शाळेबद्दल अधिक माहिती घेऊन प्रवेश घ्यावा.

अनधिकृत शाळाची यादी

अंबरनाथ
१ गोकुळ कॉन्व्हेट स्कूल, अंबरनाथ
२ समर्थ स्कूल नेवाळी ता.अंबरनाथ.
३ सनशाईन इंग्लिश स्कूल, उमरोली, ता.अंबरनाथ.
४ विवेकानंद इंग्लिश स्कूल अडीवली, ता.अंबरनाथ
५ निलम इंग्लिश स्कुल अडीवली, ता.अंबरनाथ
६ गायत्री विद्यामंदीर, ता.अंबरनाथ.
७ ऑरबिट इंग्लिश स्कुल अडीवली प्राथमिक ता.अंबरनाथ.
८ गगनगिरी इंग्लिश स्कुल अडीवली प्राथमिक ता.अंबरनाथ.

भिवंडी
९ नॅशनल इंग्लिश स्कूल, दापोडे,ता.भिवंडी.
१० देविका इंग्लिश मिडियम स्कूल काल्हेर, ता.भिवंडी.
११ द विनर्स इंग्लिश मिडियम स्कूल कांबे, ता.भिवंडी.
१२ अवेंचुरा इंग्लिश स्कूल कोन, ता.भिवंडी
१३ अग्निमाता इंग्लिश स्कूल पिंपळास, ता.भिवंडी
१४ व्हि.पी.इंग्लिश स्कूल पिंपळास, ता.भिवंडी
१५ समर्थ विद्यालय तलाईपाडा पिंपळनेर, ता.भिवंडी
१६ सुगराबिबी इंग्लिश स्कूल, तळवली, ता.भिवंडी
१७ ग्लोबल इंग्लिश स्कूल, वडूनघर, ता. भिवंडी
१८ इंग्लिश मिडीयम स्कूल, कुंदेफाटा, ता.भिवंडी
१९ इकरा इंग्लिश स्कूल, पडघा, ता.भिवंडी.
२० प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल, भोईरपाडा, ता.भिवंडी

कल्याण
२१ जी.के. इंग्लिश हायस्कूल खडवली, ता.कल्याण
२२ डिन्गेटी कॉन्व्हेट स्कूला कोळेगांव, ता.कल्याण.
२३ नवज्योती बेथनी विद्यापिठ रुंदे, ता.कल्याण.
२४ युनिक इंग्लिश मिडियम स्कूल टिटवाळा, ता.कल्याण
२५ सरस्वती इंग्लिश स्कूल दहिसर, ता.कल्याण
२६ आयडीएल इंग्लिश स्कूल दहिसर, ता.कल्याण
२७ सावित्रिबाई फुले इंग्लिश प्रायमरी स्कूल- म्हारळ, ता.कल्याण
२८ सिबॉयसीस इंग्लिश स्कूल, कोंदेरी, ता.कल्याण
२९ रायन इंटरनॅशनल स्कूल, रुणवान गार्डनजवळ डोंबिवली (पु.) ता.कल्याण.
३० बी.बी.आर.आर.टी..स्कूल, कांबा म्हारळ, ता.कल्याण.

शहापुर
३१ एम.आर.राणे इंग्लिश स्कूल, आसनगांव, ता.शहापुर
३२ शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल शेरे, ता.शहापुर
३३ एम.जे.वर्ल्ड इंग्लिश मिडीयम स्कू‍ल ‍ आदिवली, ता.शहापुर.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन मान्यता असलेल्या शाळेत पाल्याचे प्रवेश घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

पालकांना जागृत करण्याच्या उद्देशाने अनधिकृत शाळांची यादी प्रसिध्द करत आहोत. पालकांनी शाळा संदर्भातील माहिती घेऊन शाळेत प्रवेश घेतले तर अनधिकृत शाळा बंद होतील असं शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading