धर्मांतराचे आव्हान आणि समान नागरी कायदा याविषयी व्याख्यानाचं आयोजन

धर्मांतराबद्दल समाजात मत-मतांतरे असली तरी धर्मांतराचे वास्तव आणि सत्य परिस्थिती समाजासमोर यावी यासाठी वंदे मातरम संघ आणि दीनदयाळ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जून रोजी धर्मांतराचे आव्हान आणि समान नागरी कायदा याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी केरळ येथील ओ. श्रुती आणि विशाली शेट्टी हे त्यांचा इस्लाम धर्मांतर आणि पुन्हा हिंदु धर्माचा स्वीकार हा थरारक प्रवास कथन करणार आहेत. ओ. श्रुती यांनी लिहिलेल्या रिव्हर्जन या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात येणार असुन दि केरला स्टोरीचे या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन हे देखील यावेळी उपस्थित रहाणार आहेत. तर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.अंजली हेळेकर यांचे समान नागरी कायदा यावर व्याख्यान होणार आहे. दि केरला स्टोरीचे या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन हे उपस्थित रहाणार आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ अंजली हेळेकर यांचे समान नागरी कायद्यावर व्याख्यान होईल. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार कार्यक्रमाचा समारोप करतील. आव्हान आणि संधी यातून सध्याची वाटचाल होत आहे. राष्ट्रीय विचारधारा बळकट होत आहे. त्याचवेळी राष्ट्रीय विचारांवर आघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. अनुकूलता आणि प्रतिकूलता असा संघर्ष वाढत आहे. अश्यावेळी समाजात गैरसमज निर्माण होतो. नागरिकांची दिशाभूल होते. या पार्श्वभूमीवर वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी धर्मांतराचे वास्तव आणि समान नागरी कायदा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे आयोजक वंदे मातरम संघांचे संस्थापक संदीप लेले आणि कार्यक्रम समन्वयक माधव नानिवडेकर, मकरंद मुळे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading