प्राईड प्रेसिडेन्सी लक्झरिया गृहसंकुलातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टँकमध्ये गुदमरून ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यातील प्राईड प्रेसिडेन्सी लक्झरिया या गृहसंकुलातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टँकमध्ये गुदमरून ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ५ कामगार जखमी झाले आहेत. ढोकाळी येथील या सोसायटीच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सफाई सुरू असताना यामध्ये ११ कामगार अडकले होते. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं या कामगारांना बाहेर काढण्यासाठी काम सुरू केलं. मात्र या कामगारांना बाहेर काढताना यामध्ये अमित पुहाल, अमन बादल आणि अजय बुंबक या ३ कामगारांचा मृत्यू झाला. तर विरेंद्र हटवाल, मंजित वैद्य, जसबीर पुहाल आणि रूमर पुहाल या ५ कामगारांना वाचवण्यात यश आलं. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राईड प्रेसिडेन्सी लक्झरिया सोसायटीतील हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधकाम व्यावसायिकांनी बांधलं होतं आणि ७ वर्षापूर्वी ते गृहसंकुलाच्या ताब्यात देण्यात आलं होतं. काल या सांडपाणी केंद्राची स्वच्छता सुरू होती. कामगारांनी आपलं रात्रीचं जेवण घेतल्यानंतर पुन्हा लगेचच कामाला सुरूवात केली. तीन कामगार आतल्या टाकीमध्ये स्वच्छतेसाठी उतरले असताना ते गुदमरून जागीच मृत्यूमुखी पडले तर उर्वरीत ८ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading