प्रसिद्ध चरित्र अभिनेते जयंत सावरकर यांचं अल्पशा आजाराने निधन

सुप्रसिद्ध अभिनेते जयंत सावरकर यांच अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८८ वर्षांचा होते. सिंधम हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. ‘जयंत सावरकर यांनी नानाविध चरित्र भूमिका सहजगत्या केल्या. हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका या माध्यमातून आपल्या कसदार अभिनयचा ठसा उमटवला.

त्यांच्या जाण्याने एक ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुरवातीस मुंबईत वास्तव्यास असणारे जयंत सावरकर गेली १० वर्ष ठाण्यात वास्तव्याला होते. ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेहोते. एकच प्याला, अवध्य, तुज आहे तुजपाशी, दिवा जळू दे सारी रात, वरचा मजला रिकामा, सूर्यास्त, व्यक्ती आणि वल्ली, हिमालयाची सावली या नाटकातील भूमिका गाजल्या. मी एक छोटा माणूस हे संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारं आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते. विष्णुदास भावे पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कारानी सन्मानित झाले होते.आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने रसिकांच्या मनात घर करून राहिलेला, दोन पिढ्यांना जोडणारा ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. जयंत सावरकर यांच पार्थिव गडकरी रंगायतन मध्ये दर्शनासाठी ठेवले जाणार आहे

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading