वृक्षां सभोवताली असलेले सिमेंट काँक्रीट निष्कासित करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश


ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात निसर्गाचा समतोल राखण्याचा दृष्टीकोनातून वृक्षलागवड करण्यात आली असून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या सभोवती असलेले सिमेंट काँक्रिट निष्कासित करावे असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीची बैठक घेवून महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व रस्त्यांवर सर्व्हे करुन झाडांभोवती असलेल्या कठड्याचे डि-काँक्रिटायझेशन करुन तसा प्रभाग समितीनिहाय अहवाल 3 1 जुलैपर्यत सादर करण्याचे निर्देश आज सर्व संबंधितांना दिले. महापालिका कार्यक्षेत्रात जवळजवळ 400 कि.मी रस्त्याचे जाळे पसरलेले आहे. या रस्त्यांच्या दुतर्फा शास्त्रोक्त पध्दतीने वृक्ष लागवड केलेली असून त्यापैकी ज्या वृक्षांच्या सभोवती सिमेंट काँक्रिट आहे ते निष्कासित करावे संदर्भात उच्च न्यायालयाने अंदाजे 7396 झाडांचे डि-काँक्रिटायझेशन करण्याबाबत आदेश दिले आहेत. प्रभाग समितीनिहाय झाडांचे सर्व्हेक्षण करुन वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा आणि सद्यस्थितीत असलेले सिमेंटीकरण तात्काळ हटवून या ठिकाणी झाडासभोवती तीन बाय तीन फूटाची जागा मोकळी ठेवून त्यात माती राहील या दृष्टीकोनातून कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तयांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading