ठाण्यामध्ये गेल्या २४ तासात ठाण्यात ८७ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाण्यामध्ये गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरू असून गेल्या २४ तासात ठाण्यात ८७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे ठाण्याच्या सखल भागात पाणी साचण्याच्या घटना पहायला मिळत आहेत. गेले काही दिवस होत असलेल्या या पावसामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे. मात्र त्याचबरोबर तब्येतीच्या तक्रारींमध्येही वाढ झाल्याचं दिसत आहे. सर्दी, खोकला, ताप यांचे रूग्ण वाढल्याचं दिसत आहे. पावसामुळे विविध ठिकाणी झाड अथवा झाडाच्या फांद्या पडण्याच्या घटनाही रोज पहायला मिळत आहेत. यामध्ये सुदैवानं अद्याप फारशी जिवितहानी झाली नसली तरी वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पहायला मिळत आहे. आज खोपटमध्ये सिंग चाळीजवळ एक झाड पडलं. हे झाड पडल्यामुळे ६५ वर्ष जुन्या घराचे छप्पर पूर्ण पडलं आहे. बैराग मिश्रा यांचं हे घर असून यामध्येही कोणतीही हानी झाली नाही. घरामध्ये सहा व्यक्ती राहत असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. ठाण्यामध्ये १ जून ते २४ जुलैपर्यंत १८९५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात १४२८ मिलीमीटर पाऊस झाला होता. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी ४६५ मिलीमीटर पाऊस अधिक झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading