प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्याक्षिक

आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी वापरल्या जाणा-या व्होटर व्हेरिफेबेल पेपर ऑडीट ट्रेल मशीनचे प्रात्यक्षिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवण्यात आलं. स्वीप म्हणजे सिस्टीमॅटिक व्होटर एज्युकेशन ॲण्ड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्राम या अंतर्गत हे प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. या व्हीव्हीपॅटमुळे मतदारांना आपल्या मताची खातरजमा करण्याची संधी मिळणार आहे. स्वीप अंतर्गत शहरातील प्रमुख महाविद्यालयं, प्रशिक्षण प्रबोधिनी, औद्योगिक संस्था, राजकीय पक्ष आणि प्रसिध्दी माध्यमं यांना मतदार नोंदणी अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संबंधी माहिती देण्याचं काम सुरू आहे. देशातील सर्व लोकसभा मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट यंत्र बसवलं जाणार आहे. ईव्हीएम मशिनवर असलेल्या उमेदवारांच्या नावासमोरील बटन दाबल्यानंतर उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लीप ७ सेकंद मतदाराला दिसणार आहे. त्यानंतर आपोआप ही स्लीप कट होऊन ती सीलबंद पेटीत जमा होणार आहे. ही व्हीव्हीपॅट मशिन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिका-यांना देण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading