प्रशासनाने कोणतीही चौकशी नेमली तर त्याला सामोरे जाण्याची तयारी – महेश आहेर

प्रशासनाने कोणतीही चौकशी नेमली तर त्याला सामोरे जाण्याची तयारी महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांनी दाखवली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावयाला जीवे मारण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आरोपा नंतर आव्हाडांच्या निकटवर्ती यांनी महेश आहेर यांना मुख्यालयाच्या समोरच चोप दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर महेश आहेर यांनी देखील माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. आपण वारंवार सांगत आहोत की, 2021 पासून आपल्या मोबाईलचा डाटा काढून मोर्फ ऑडिओ क्लिप तयार केल्या जात आहेत. अशी तक्रारही पोलिसांकडे केली आहे. अभिजीत पवार यांनी जर ते ऑडियो क्लिप वायरल केले असतील तर त्यांच्याविरोधात पोलिस आयुक्तांना तक्रार केली आहे. हे व्हिडिओ तयार केलेले आहेत. मिमिक्री आर्टिस्ट कडुन हे करुन घेतले आहेत. पोलिसांनी तपास केला पाहिजे की ही ऑडिओ क्लिप जितेंद्र आव्हाड यांच्याकडे कशी गेली. तसेच रेंटल हाऊसींग मधील रूम्स या भाडे तत्वावर दिल्या जातात. तसेच आम्ही जे काही वाटप केले आहे ते वरिष्ठांची पूर्व मंजूरी घेऊनचं केलेले आहे. जर प्रशासनाने त्यावर चौकशी नेमली तर त्याला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे असेही आहेर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading