प्रशांत सिनकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार

पर्यावरण संवर्धना विषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर यांना कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमात गौरविण्यात आले. अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि बालक मंदिर संस्था कल्याण आणि सार्वजनिक वाचनालय कल्याण यांच्या सहकार्यातून सलग ३६ तास आणि एकत्रित १०० तास अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले पाहिजेत या विषयी तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केलं. यावेळी सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या मध्ये पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर यांना प्रतिष्ठेचा भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading