छत्रपती शिवाजी रुग्णालयातील फॉल सीलिंग चा तुकडा पडून रुग्णालयातील एक कर्मचारी जखमी

छत्रपती शिवाजी रुग्णालयातील फॉल सीलिंग चा तुकडा पडून रुग्णालयातील एक कर्मचारी जखमी झाला आहे. छत्रपती शिवाजी रुग्णालय यां ना त्या कारणाने सतत प्रकाश झोतात आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील मृत्यूमुळे रुग्णालय चर्चेत आलं होतं. आता रुग्णालयातील फॉल्स सेलिंग चा तुकडा पडल्यामुळे कर्मचारी जखमी झाल्याने रुग्णालय पुन्हा चर्चेत आल आहे.

काल रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला
पी एम ओ रेस्ट रूम मधील छताचा प्लास्टर आणि पीओपी चा काही भाग कोसळल्यामुळे हा प्रकार घडला यामध्ये दिशान गोतारणे हा कर्मचारी जखमी झाला आहे त्याच्या डोक्याला आणि उजव्या हाताला आणि उजव्या पायाला मार लागला आहे. सध्या त्याच्यावरती छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता ही खोली रिकामी करण्यात आली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading