प्रवाशांना निर्जन स्थळी नेऊन लुटणा-या आणि पिंपरीतील एका मंदिरातील दानपेटी चोरणा-या आरोपींना शीळ- डायघर पोलीसांनी केलं जेरबंद

कामधंद्यानिमित्त रिक्षानं प्रवास करणा-या प्रवाशांना निर्जन स्थळी नेऊन लुटणा-या आणि पिंपरीतील एका मंदिरातील दानपेटी चोरणा-या आरोपींना शीळ- डायघर पोलीसांनी जेरबंद केलं आहे. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. डायघर गावात राहणारे योगेश लोहार हे कल्याण फाटा येथून कळंबोली बस स्टॉपकडे जात असताना दहीसर मोरी येथे आल्यावर रिक्षामध्ये बसलेल्या अन्य दोन प्रवाशांनी रिक्षा चालकाच्या संगनमताने लोहार यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल, पॉवर बँक, २८ हजारांची रोख रक्कम पळवून नेली. पोलीसांनी याप्रकरणी महम्मद उर्फ ममु सय्यद, मुस्तफा पावसकर, मुजम्मिल जासीम शेख अशा तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ६५ हजारांचा हा ऐवज जप्त केला. हे तिघेजण सराईत गुन्हेगार आहेत. पिंपरी-चिंचवड मधील केदारेश्वर मंदिरातील मुख्य मंदिराचे कुलुप तोडून ४० ते ४५ हजारांची चोरी झाली होती. याप्रकरणात तांत्रिक तपास करून डायघर पोलीसांनी शरीफ शेख याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या चौकशीत दानपेटीतील चोरी केलेली ४६ हजार रूपयाहून अधिकची रक्कम तसंच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा पोलीसांनी जप्त केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading