घोडबंदर रस्त्यावर काल रात्री गॅस टँकर उलटा झाल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत

घोडबंदर रस्त्यावर काल रात्री एक गॅस टँकर उलटा झाल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जामनगरहून हा गॅसचा टँकर नागोठण्याला चालला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास गायमुख जकात नाक्याजवळ हा टँकर पलटी झाला. टँकर पलटी झाल्यामुळं या रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. पोलीस, ठाणे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं धाव घेऊन टँकरला पुन्हा सुस्थितीत आणलं आणि त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. मात्र वाहतूक ठप्प झाल्यामुळं या रस्त्यावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading