प्रभाग समिती अध्यक्षपदी महिलांना विशेष प्राधान्य – महापौर

ठाणे महापालिकेच्या विविध समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे संजय भोईर यांची बिनविरोध निवड झाली तर नऊ प्रभागसमितीवर देखील अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बहुतांश महिला नगरसेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. महापालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती आणि नऊ प्रभाग समित्यांच्या सभापती अध्यक्षपदाची निवडणूक वेबिनारच्या माध्यमातून पार पडली. स्थायी समिती सभापतीपदी संजय भोईर, परिवहन सभापती म्हणून विलास जोशी यांची निवड झाली आहे. नौपाडा-कोपरी – नम्रता फाटक, वागळे – एकता भोईर, लोकमान्य- सावरकरनगर – वर्तकनगर, माजिवडा-मानपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा, दिवा प्रभागसमितीच्या अध्यक्षपदी अनुक्रमे, आशा डोंगरे, राधिका फाटक, भूषण भोईर, वहिदा खान, वर्षा मोरे, दिपाली भगत आणि सुनिता मुंडे यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी सर्व निवडणुका बिनविरोध पार पडल्या असून महापालिकेच्या विकासाला एक वेगळी चालना मिळणार असल्याचे मत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. तसेच महापालिकेच्या पाच ‍विशेष समित्यांचे गठन देखील करण्यात आले असून या समिती सभापतीपदाची निवड देखील येत्या काही दिवसात पार पडणार असल्याचे माहिती महापौरांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading