प्रबोधनकार ठाकरे उद्यानाची झाली दुर्दशा

प्रबोधनकार ठाकरे यांची पुण्यतिथी संपन्न होत असताना ठाण्यातील प्रबोधनकारांच्या नावानं असलेल्या उद्यानाची दुर्दशा उडाली असल्याचं दिसत आहे. ठाण्यात शिवसेनेची सत्ता असताना प्रबोधनकार ठाकरे उद्यानाकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. ठाण्यामध्ये कॅसल मिल जवळ प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावानं उद्यान आहे. पण हे उद्यान आता नावालाच शिल्लक असल्याचं दिसत असून उद्यानाची रयाच गेली आहे. या उद्यानामध्ये भंगार रिक्षा, मोडकळीस आलेली खेळणी, गंजलेलं लोखंडाचं सामान, जीर्ण अवस्थेत असलेलं प्रवेशद्वार पहायला मिळत आहे. या उद्यानाचं लोकार्पण झालेल्या सोहळ्याचा फलक मात्र झळकत आहे. पण उद्यानाची मात्र दुरावस्था झाल्याचं दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading