इंटरसिटीच्या प्रवाशांना मध्य रेल्वेकडून दुजाभावाची वागणूक

इंटरसिटी आणि डेक्कन क्वीनच्या प्रवाशांना मध्य रेल्वेकडून दुजाभावाची वागणूक मिळत असून मध्य रेल्वे इंटरसिटीनं प्रवास करणा-या प्रवाशांवरील अन्याय दूर करणार का असा प्रश्न इंटरसिटीनं प्रवास करणा-या प्रवाशांकडून विचारला जात आहे. गेले काही महिने इंटरसिटी एक्सप्रेस जाताना आणि येताना निर्धारीत वेळेपेक्षा २० ते २५ मिनिटं उशीरा पोहचत आहे. तर दुसरीकडे डेक्कन क्वीन मात्र निर्धारीत वेळेत पोहचत आहे. मध्यंतरी इंटरसिटी एक्सप्रेसला पुश पूल सिस्टीम बसवण्याचा डंगोरा मध्य रेल्वेनं पिटला होता. त्यामुळं पुणे-मुंबईच्या प्रवासामध्ये वेळेची बचत होईल असा दावाही करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात उलट घडत आहे. दुसरीकडे डेक्कन क्वीन मात्र वेळेवर धावत आहे. मध्य रेल्वेनं इंटरसिटी प्रवाशांचा हा दुजाभाव दूर करावा अशी प्रवाशांची मागणी आहे. याप्रकरणी काही रेल्वे प्रवाशांनी खासदार राजन विचारे यांच्याकडेही हे गा-हाणं मांडलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading