पोलीस आयुक्तालय उल्हासनगर परिमंडळा अंतर्गत 8 पोलीस ठाणेमधील एकुण एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्येमाल परत करण्यात पोलीसांना यश.

पोलीस आयुक्तालय उल्हासनगर परिमंडळा अंतर्गत 8 पोलीस ठाणेमधील एकुण एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्येमाल परत करण्यात पोलीसांना यश आले आहे.
उल्हासनगर परिमंडळा अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन परिसरात 2022 आणि 2023 या वर्शात दागिने, रोख रक्कम, विविध कंपनीचे मोबाईल फोन, वाहने चोरीस गेले होते. सोनसाखळी चोरी आणि इतर चोरीच्या गुन्हयामधील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि इतर चोरीच्या तपासात तांत्रिक मदतीने अतिशय कौशल्यपुर्ण तपास करुन गुन्हयातील आरोपीना जेरबंद करुन त्यांचेकडुन गुन्हयातील एकुण 1,41,097,- रुपये किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. गुन्हयात अटक आरोपीकडुन एकुण सुमारे 44,58,625/- रुपये सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम 6,16,620/- हस्तगत करण्यात आला आहे. तो फिर्यादी यांना सन्मानपुर्वक परत करण्यात आला आहे. मोटारवाहन चोरीचे गुन्हयात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायाने ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करुन, संशयीत वाहनांची तपासणी करुन, जुने मोटारसायकल खरेदी विक्री करणारे मोटार गॅरेज तपासुन तसेच टोलनाक्यावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करुन तांत्रिक विष्लेशण आणि गुप्त बातमीदार यांचा वापर करुन अतिशय कौशल्यपुर्ण कामगिरी करुन एकुण सुमारे 40,37,000/- रुपये किमंतीची एकुण 54 वाहने तसेच सुमारे 8,82,050/- रुपये किमंतीचा इतर मुद्येमाल जप्त करुन संबंधीत फिर्यादी यांना सन्मानपुर्वक परत करण्यात आलेला आहे. चोरीस गेलेले/हरविलेले मोबाईल फोनबाबतची सविस्तर माहिती क्रेंद शसनाने तयार केलेल्या CEIR या अॅपमध्ये भरुन त्यानुसार चोरीस गेलेले/हरविलेले मोबाईल फोन वापरकत्र्यांचे पत्त्यावर समक्ष जावुन तसेच तांत्रिक पध्दतीने बारकाईने विष्लेशण करुन त्याआधारे विविध मोबाईल कंपन्याचे मोबाईल सुमारे 42,03,049/- किमंतीचे एकुण 323 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत. असा मुद्येमाल संबंधीत फिर्यादी यांना सन्मानपुर्वक परत करण्यात आला आहे.
वरील प्रमाणे कौशल्यपुर्ण उकल केलेल्या गुन्हयातील एकुण एक कोटी एक्केचाळीस लाख सत्यान्नव हजार तीनशे चव्वेचाळीस रुपये किमंतीचा जप्त मुद्येमाल नागरीकांना हस्तांतरीत करण्यात आला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading