पोलीसाच्या सतर्कतेमुळं आत्महत्या करणा-याचा वाचला जीव

पोलीसानं दाखवलेल्या सतर्कतेमुळं एका व्यक्तीचा आज जीव वाचू शकला. कळव्यातील शिवाजी चौकात बांधकाम चालू असलेल्या पूलावरून लोखंडी सळयांना दोर बांधून धनाजी कांबळे हे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार जयंत पवार, जंगम आणि पोलीस शिपाई उबाळे तिथून जात होते. त्यांनी हा प्रकार पाहून कांबळे यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. कांबळे यांनी पूलाच्या लोखंडी सळ्यांना दोरी बांधून उडी मारली आणि काही काळ ते पूलाला लटकत राहिले. पवार यांनी जवळच पूलाच्या कामासाठी असलेल्या क्रेनच्या सहाय्यानं कांबळे यांचा जीव वाचवला आणि त्यांना रूग्णालयात दाखल केलं. कांबळे यांच्या मुलानंही रेल्वेखाली आत्महत्या केल्यामुळं ते आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोलीसांना सांगितलं. पवार यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी त्यांना पारितोषिक जाहीर केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading