पेट्रोलनं नव्वदी पार केल्याबद्दल काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा लाडू वाटून निषेध

पेट्रोलनं नव्वदी पार केल्याबद्दल काँग्रेसतर्फे इटर्निटी मॉल तीन हात नाका येथील पेट्रोल पंपावर मोदी सरकारचा अनोख्या पध्दतीनं लाडू वाटून निषेध करण्यात आला. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. एकीकडे कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसलेला असतानाच दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले भाव हे आर्थिक कंबरडं मोडण्याचं काम करत आहेत. जागतिक पातळीवर एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव घसरले असताना देशात मात्र पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीच घट झालेली नाही. या निषेधार्थ काँग्रेसतर्फे लाडू वाटून अनोख्या पध्दतीनं हे आंदोलन करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading