ठाण्यामध्ये सलग दुस-या दिवशी जलवाहिनी फुटण्याचा प्रकार

ठाण्यामध्ये सलग दुस-या दिवशी जलवाहिनी फुटण्याचा प्रकार घडला आहे. काल रात्री पावणे अकराच्या सुमारास महापालिकेकडून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी तुटली आहे. वागळे इस्टेट रस्ता क्रमांक २२ येथे रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून इंदिरानगरमधील व्हीवो मोबाईल दुकानाच्या बाजूला ही जलवाहिनी फुटली आहे. ही जलवाहिनी फुटल्यामुळे आजूबाजूच्या परिसराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं दुरूस्तीचं काम आज सुरू केलं असून दुरूस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत होणार आहे. परवाच्या दिवशीही वागळे इस्टेट परिसरात अशीच जलवाहिनी फुटली होती. त्यामुळं या परिसरात पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading