पेटीएमची केवायसी करण्यावरून काही व्यक्तींची ५ लाख रूपयांची फसवणूक

पेटीएमची केवायसी करण्यावरून ठाण्यातील उद्योजकाप्रमाणेच ठाकुर्लीतील काही व्यक्तींची सुमारे ५ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ठाकुर्लीमध्ये राहणारे रोहन बोंद्रे यांना रविवारी पेटीएमच्या केवायसी संदर्भात एक दूरध्वनी आला. त्यावेळी त्यांना क्वीक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आलं. त्याप्रमाणे त्यांनी ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर पेटीएमच्या वॉलेटमध्ये त्यांना १० रूपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार बोंद्रे यांनी १० रूपये भरले. त्यानंतर त्यांना आधारकार्ड आणि पॅनकार्ड स्कॅन करण्यास सांगण्यात आलं. बोंद्रे यांनी तसे केले असता त्यांच्या वॉलेटमधून १ लाख २० हजार रूपये काढून घेण्यात आले. बोंद्रे यांच्याप्रमाणेच इतर काही मोबाईल धारकांनी इतरांची सुमारे ५ लाखांची फसवणूक केली. सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading