पूर्व द्रूतगती महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांकरिता नवा टोलनाका

पूर्व द्रूतगती महामार्गावर नियमित होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. यासाठी जड वाहनांकरिता नवा टोलनाका उभारण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या जकात नाक्याच्या जागेत हा टोलनाका उभारण्यात आला आहे. हा टोलनाका खास अवजड वाहनं, बसेस, ट्रक तसंच मल्टी एक्सेल वाहनांसाठी राहणार आहे. या वाहनांसाठी खास टोलनाका उभारण्यात आल्यामुळे पूर्व द्रूतगती महामार्गावर होणा-या वाहतूक कोंडीला काहीसा आळा बसू शकेल. मोठी वाहनं टोलनाक्यावर टोलसाठी उभी राहिल्यामुळे अनेकदा वाहनांच्या रांगा लागतात. पण आता अशा वाहनांकरिता वेगळा टोलनाका उभारण्यात आल्यानं पूर्व द्रूतगती महामार्गावरील सर्व वाहनं या टोलनाक्यावरून वळवली जाणार आहेत. त्यामुळं आता दुचाकी, चारचाकी अशा खाजगी वाहनांना नियमित टोलनाक्यावरून वेगानं वाहनं नेता येतील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading