पीएम श्री योजने अंतर्गत ठाण्यातील प्रथम टप्प्यात १४ शाळांची निवड

राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पीएम श्री योजना राबली जात आहे. योजने अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १४ शाळाची निवड प्रथम टप्प्यात झाली आहे. निवड झालेल्या शाळांच्या भौतिक प्रकारच्या सर्व सुधारणेसाठी काम करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५ शाळा, महापालिकातील ६ शाळा, नगरपालिका २, शहापुर नगरपंचायत १ अशा प्रकारे शाळांची निवड करण्यात आली आहे. इमारत दुरुस्ती, नवीन वर्ग खोली, स्वच्छता गृह, संरक्षण भिंत, सौर ऊर्जा, सायन्स लॅब, संगणक लॅब इत्यादी सर्व भैतिक सुविधासाठी शाळेच्या गरजेनुसार शासनाकडे प्रस्ताव सादरीकरण करण्यासाठी कारवाई सुरू आहे.
भिवंडीतील डोहळेपाडा जिल्हा परिषद शाळा, कल्याणमधील माणिवली जिल्हा परिषद शाळा, मुरबाड मधील कोलठण जिल्हा परिषद शाळा, शहापूर जिल्हा परिषद शाळा, वाशिंद जिल्हा परिषद शाळा, अंबरनाथ मधील काकडवाल जिल्हा परिषद शाळा, बदलापूर नगर परिषद शाळा, अंबरनाथ नगर परिषद शाळा, भिवंडी महापालिका अवचितपाडा उर्दू हायस्कूल, कल्याण महापालिका तिसगांव शाळा, नवी मुंबई महापालिका आंबेडनगर शाळा, उल्हासनगर महापालिका शाळा क्रमांक १२, ठाणे महापालिका शाळा क्रमांक ६२ आणि मिरा-भाईंदर शाळा क्रमांक २२ अशा १४ शाळांची पीएम श्री योजने अंतर्गत प्रथम टप्प्यात निवड झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading