पीएमसी बँकेच्या संतप्त खातेदारांची मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शनं

पंजाब महाराष्ट्र बँकेच्या संतप्त खातेदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाण्यातील सभेत निदर्शनं केली. हातात फलक घेऊन न्याय देण्याची मागणी करणा-या या खातेदारांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन पाठपुरावा करून पंतप्रधानांनाही यात लक्ष घालण्यास सांगेन असं आश्वासन दिलं. ठाणे विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री काल ठाण्यात आले होते. महापालिकेसमोरील रस्त्यावर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात केलेल्या कामांचा उहापोह केला. सभा संपवून निघत असताना महापालिका मुख्यालयाच्या आवारात गोळा झालेल्या पीएमसी बँक खातेदारांनी हातातील फलक दर्शवून मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शनं करण्यास सुरूवात केली. काही दिवसापूर्वीच पीएमसी बँकेवर रिझर्व बँकेनं निर्बंध टाकल्यानं बँक बुडीत निघाली. या पार्श्वभूमीवर बँकेतील आमची रक्कम परत करून आमचीही दिवाळी झगमगू द्या अशा मागण्या खातेदारांनी केल्या. अखेर खातेदारांचा रोष ओळखून मुख्यमंत्री तात्काळ खातेदारांना भेटले. सध्या आचारसंहिता सुरू असल्यानं याबाबत काही बोलू शकत नाही. तरीही मतदान झाल्यानंतर तातडीनं याचा पाठपुरावा करू तसंच पंतप्रधानांसमोरही ही बाब मांडू. खातेदारांवर कोणताही परिणाम होऊ देणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading