पावसानं ठाणे तालुक्यातील चार महिन्यांच्या पावसाची सरासरी अवघ्या दोन महिन्यातच गाठली

ठाणे तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या दोन महिन्यातच सरासरीच्या ८५ टक्के पाऊस झाला आहे. ठाण्यामध्ये जून, जुलै या महिन्यात साधारणत: १४५० मिलीमीटर पाऊस होतो. पण यंदा या २ महिन्यात २ हजार ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात ठाण्यामध्ये साधारणपणे ८३ मिलीमीटर पाऊस होतो तर या महिन्यात अवघ्या ४ दिवसात सरासरीच्या अर्धा पाऊस झाला आहे. म्हणजे ३९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जून ते आत्तापर्यंत साधारणत: १५३२ मिलीमीटर पावसाची नोंद होते. पण यंदा याच कालावधीत २ हजार ६३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत ८४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरवर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत ८५ मिलीमीटर पावसाची नोंद होते. पण यंदा मात्र अजून दोन महिने जायचे असताना अवघ्या दोन महिन्यातच पावसानं ही सरासरी गाठली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading