बारावीचा जिल्ह्याचा निकाल ९९.८७ टक्के

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालात जिल्ह्याचा निकाल ९९.८७ टक्के लागला आहे.

१०वी, ११वी आणि १२वीच्या गुणवत्तेवर हा निकाल जाहीर झाला आहे. बारावीमध्ये जिल्ह्यात ९९ टक्क्यांच्या वर विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळं १३वीच्या प्रवेशाबाबत समस्या निर्माण होणार आहेत. यंदा जिल्हाचा निकाल ९९.८७ टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिली. जिल्ह्यातील ८६ हजार ५३७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते त्यापैकी ८६ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी ४१ हजार ९४१ मुली तर ४४ हजार ४९२ मुलं उत्तीर्ण झाली. म्हणजे यंदा उत्तीर्ण होणा-यांमध्ये मुलींपेक्षा मुलांची संख्या अधिक आहे. यावर्षी जिल्ह्यामध्ये बारावीचा उल्हासनगरचा बारावीचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९.९४ टक्के लागला आहे. 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading