परमवीर सिंग यांच्यासह खंडणी प्रकरणातील २८ जणांच्या विरूध्द लूक आऊट नोटीस जारी करण्याची मागणी

ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह खंडणी प्रकरणातील २८ जणांच्या विरूध्द लूक आऊट नोटीस जारी करावी अशी मागणी या प्रकरणातील तक्रारदारांनी केली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात केतन तन्ना आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी ही मागणी केली आहे. ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, विकास दाभाडे अशा २८ जणांनी सोनू जालान आणि केतन तन्ना यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून करोडो रूपयांची खंडणी उकळल्याची तक्रार ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्तच आरोपी असल्यामुळं पोलीस सावधगिरीनं तपास करत आहेत. याच प्रकरणात पोलीस आयुक्तांसह इतर आरोपी परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्यामुळं त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करावी अशी मागणी जालान आणि तन्ना या द्वयीनं केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading