पालकमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणा-यांना त्वरीत अटक करण्याची युवासेनेची मागणी

पालकमंत्री आणि महापौरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या संजय गोडबोले आणि अज्ञात व्यक्तीच्या विरोधात युवासेनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तसेच आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना त्वरीत अटक करा नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. गेल्या काही दिवसात ठाण्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत वाद सुरू असून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. सामाजिक संकेतस्थळांवरून एकमेकांना शिवीगाळ सुरू असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी युवासैनिक, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं एकत्र आले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading