पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नौपाडा पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांना केलं मास्क, सॅनिटायझर वाटप

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नौपाडा पोलीस स्टेशनला भेंट दिली. करोनाविरुध्दच्या लढाईसाठी सध्या पोलीस दलातील कर्मचारी चोवीस तास रस्त्यावर ऊतरुन आपले कर्तव्य बजावत आहेत. या पोलीसांच्या खाकी वर्दीमागील माणसाची काळजी घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः नौपाडा पोलीस स्टेशनला भेट देऊन कर्मचारी वर्गाला सुरक्षेसाठी मास्क, सँनिटायझर तसेच शिध्याचे वाटप केले. तसेच राज्य सरकार आणि शिवसेना पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील शक्य त्या सर्व पोलीस स्टेशनना जातीने भेंट देऊन पोलीसांचे मनोधैर्य वाढवण्याचा त्यांचा मानस आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading