पाणी बिलाच्या मोठ्या थकबाकीदारांवर प्राधान्याने कारवाई करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

२०२२-२३ या आर्थिक वर्षातील पाणीपट्टी कराच्या बिलांचे वेळेत वितरण करून १०० टक्के वसुली करण्याचे आदेश देतानाच मोठ्या थकबाकीदारांवर धडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी आज दिले. प्रत्येक प्रभाग समितीनिहाय ५ मे पर्यत नॉन मीटर बिलांचे वितरण करणे, मीटरचे रीडिंग घेणे, डिमांड तयार करणे, चोरून बेकादेशीर नळ कनेक्शन शोधुन त्यांच्यावर कडक करावी करणे, वापर बदलांची नोंद घेवून देयके तयार करणे यासोबतच पाणी पट्टी वसुलीचे काम प्राधान्याने करण्याविषयी संजय हेरवाडे यांनी सांगितले. पाणी कराची वसुली वाढविण्यासाठी सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कर वसुली लिपीक यांनी आपल्या स्तरावर कठोर पावले उचलावीत. त्याचप्रमाणे पाणी वसुलीबाबत विभागाने पाणी बिलांची छपाईकरून वेळेत वितरण करून वसुली करावी अशा सक्त सूचना सर्व अधिका-यांना दिल्या. ज्या सोसायट्यामध्ये वैयक्तिक पाणी पट्टी कराची थकबाकी आहे, त्या सदनिकाधारकांची नावे जाहीर करून त्यांच्यावरही यापुढे कडक कारवाई करण्याचे निर्देश हेरवाडे यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading