वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या साकेत-बाळकुम,कोलशेत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी करून सर्वच कामांची गती वाढवून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शहरातील नागरिकांसाठी मनोरंजनात्मक जागा विकसित करून पर्यटनास चालना देण्यासाठी महापालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या साकेत-बाळकुम, कोलशेत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या कामाची माळवी यांनी पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कोलशेत येथे १३०० मीटर पाथवेचे काम प्रगतीपथावर असून उर्वरित काम तातडीने पूर्ण करणे, संरक्षण भिंती तसेच उद्यान विषयक कामे आदी कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच साकेत-बाळकूम वॉटर फ्रंट येथील कामाची पाहणी करून या परिसरात मातीचा भराव टाकून जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे,पार्किंग परिसर, सायकल ट्रॅक, हर्बल कॉर्नर, शौचालय तसेच अँम्पी थेटरची कामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading