पर्यावरणविषयक लघुचित्रपट महोत्सवास मिळाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निसर्ग आणि पर्यावरणातील जैविक आणि अजैविक संसाधनाची माहिती शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना व्हावी. तसेच निसर्ग आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल संवेदनशील बनवून पर्यावरणाच्या विविध समस्यांमध्ये विद्यार्थ्यांचा हातभार लागावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांचेद्वारे लघुचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवास शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 7 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस ठाणे महानगरपालिकेच्या वतीने साजरा कररण्यात येतो. Together for clean Air या यावर्षीच्या संकल्पनेस अनुसरून 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या लघुचित्रपट महोत्सवास शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दररोज दोन सत्रात आयोजित केलेल्या या महोत्सवात पर्यावरणाशी निगडीत अनेकविध लघुचित्रपट दाखविण्यात आले. यामध्ये तलावांचे संवर्धन, वनीकरण (देवराई), वन्य प्राण्याच्या अधिवासाचे संरक्षण, सिंगल यूज प्लास्टिक बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, हवा प्रदूषण, वातावरण बदल, नद्यांचे संवर्धन, इत्यादी अनेक विषयांवर आधारित मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील लघुपटांचा समावेश होता. प्रत्येक सत्रात विविध शाळांचे 6 हजाराहून अधिक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी – शिक्षकांना माझी वसुंधरा अभियानातंर्गत हरित शपथ देण्यात आली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading