पडवळनगर मधील नाल्यात आढळली घोरपड

वागळे इस्टेट मधील पडवळनगर मध्ये एका छोट्या नाल्यात आज एक घोरपड आढळून आली. माजी नगरसेवक विजय पडवळ यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे याबाबतची माहिती दिली. पडवळनगर येथील शाळेमागे असलेल्या शफीक कंपाऊंड येथील एका छोट्या नाल्यात ही घोरपड मिळाली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने या घोरपडीची सुखरूप सुटका करण्यात आली असून नंतर ती घोरपड वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. ही घोरपड मादी जातीची असून तीचे वजन दीड किलो होते. तर ती ४ ते ५ महिन्यांची होती असं वन विभागाकडून सांगण्यात आले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading