जीवघेणी स्पर्धा टाळून दहीहंडी उत्सव साजरा होणार – राजन विचारे

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या जांभळी नाक्यावरील महादहीहंडीसाठी आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाची नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खा. राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जीवघेणी स्पर्धा टाळून पंरपरेनुसार होणाऱ्या या उत्सवात मुंबईतील गोविंदांसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११ ची दहीहंडी, ठाण्यातील गोविंदांसाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११ आणि माँसाहेब मिनाताई ठाकरे ही महिलांसाठी ५१ हजार रुपये रोख बक्षिसाची दहीहंडी आयोजित केली आहे. आदल्या दिवशी बुधवारी दिव्यांगासाठी विशेष दहीहंडीचेही आयोजन केल्याचे खा.विचारे यांनी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading