परिवहन उपव्यवस्थापक दिलीप कानडे यांना निलंबित करण्याची राष्ट्रवादीची मागणी

परिवहन सेवेवर प्रचंड खर्च करुनही गेल्या दहा वर्षात ही सेवा तोट्यातच चालली आहे. परिवहन उपव्यवस्थापक दिलीप कानडे हे केवळ खुर्ची उबवण्याचे काम करीत आहेत. सदस्यांनी दिलेल्या पत्राला कानडे हे केराची टोपली दाखवित आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबीत करावे; अन्यथा शानू पठाण यांच्या सहकार्याने परिवहन मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिवहन सदस्य शमीम खान यांनी दिला. परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी काल सभापतींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी ठाणे परिवहन सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यास टीएमटीचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला. परिवहन सेवेत कार्यरत असलेले काही अधिकारी केवळ भ्रष्टाचारामध्ये अडकले आहेत. त्यांच्यामुळेच परिवहन सेवा तोट्यामध्ये चालत आहे. अशा अधिका-यांमुळे परिवहन सेवा आणि परिवहन समिती बदनाम होत आहे. जर असे अधिकारी सेवेत राहिले तर पुढील सहा वर्षे परिवहन सेवा फायद्यात येणार नाही. त्यामुळे परिवहन सेवेचे उपव्यवस्थापक दिलीप कानडे यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे; जर निलंबित करण्यात अडचणी असतील तर त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास मंगळवारी परिवहन कार्यालयाच्या दारात धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शमीम खान यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading